न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 12 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमधील ईडन पार्क येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 11.40 वाजता खेळवला जाईल. या रोमांचक सामन्यात पाकिस्तानची कमान युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन असेल. आगामी टी-20 विश्वचषक पाहता ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू मिचेल सँटनरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातून तो बाहेर पडला आहे. (हे देखील वाचा: How To Watch NZ vs PAK 1st T20I Live Streaming: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज होणार पहिला टी-20 सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)
Mitchell Santner ruled out of the 1st T20i against Pakistan after testing positive for COVID19. pic.twitter.com/jzRsiFDYkZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)