IND vs PAK 1st T20: न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 12 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमधील ईडन पार्क येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 11.40 वाजता खेळवला जाईल. या रोमांचक सामन्यात पाकिस्तानची कमान युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन असेल. आगामी टी-20 विश्वचषक पाहता ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना या संघाकडून रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे. भारतातील चाहते ही मालिका लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहू शकतात. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. (हे देखील वाचा: Steve Smith आणि टेनिस स्टार Novak Djokovic एकाच मैदानावर दिसले क्रिकेट आणि टेनिस खेळताना, व्हिडिओ होतोय व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)