इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 21वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने सलग दोन सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आहे. पंजाब किंग्जसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने निर्धारित 20 षटकात आठ गडी गमावून 159 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सच्या वतीने सलामीवीर केएल राहुलने वेगवान फलंदाजी करताना ७४ धावांची शानदार खेळी केली. पंजाब किंग्जकडून सॅम करणने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पंजाब किंग्जला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 160 धावा करायच्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)