इडन गार्डन्सवर IPL 2024 मधील KKR विरुद्ध MI सामन्यापूर्वी अभिषेक नायरसोबत रोहित शर्माच्या गप्पा सोशल मीडियावर चर्चेचे कारण ठरले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आगोदर केकेआरने पोस्ट केला आणि नंतर हटवला. ज्यामध्ये रोहित केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलत आहे आणि त्यांच्या संभाषणामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. व्हिडिओतील ऑडिओ फारसा स्पष्ट नसला तरी, चाहत्यांनी दावा केला की रोहितने म्हटले आहे की, प्रत्येक गोष्ट बदलत आहे, हे अजूनही माझे घर आहे. मी हे मंदिर बांधले आहे. लीक झालेल्या या क्लिपचा ऑडिओ स्पष्ट आणि निर्णायक नसल्यामुळे, चाहत्यांमध्ये अशी अटकळ बांधली जात आहे की रोहित आयपीएल 2024 चा मुंबई इंडियन्ससोबतचा शेवटचा हंगाम असेल. हा व्हिडिओ संपूर्ण इंटरनेटवर व्हायरल झाला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. खाली काही पहा.
व्हिडिओ
Chat - Rohit to Nayar "Ek ek cheez change ho rha hai!,, Wo unke upar hai,,, Jo bhi hai wo mera ghar hai bhai, wo temple mene banwaya hai" !
Last line - "Bhai mera kya mera to ye last hai".
And now KKR deleted that chatting video of Rohit Sharma and Abhishek Nayar. pic.twitter.com/b5gNtFax2T
— Extinguisher 💜 (@extinguisherrr) May 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)