विश्वचषकाच्या 25व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात श्रीलंकेसमोर गतविजेत्या इंग्लंडचे (SL vs ENG) आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 33.2 षटकांत केवळ 156 धावा करू शकला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 50 षटकात 157 धावा करायच्या आहेत.
ENGLAND BOWLED OUT FOR 156..!!!
From 45/0 to 156/10 - The Lankan lions are roaring at the Chinnaswamy Stadium. pic.twitter.com/RyFwuRWHoi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)