India National Cricket Team vs Ausralia Men's National Cricket Team: बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीतील दुसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात सर्वांच्या नजरा यजमान संघाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत, ज्यांना या मालिकेतील पहिल्या सामन्यात 295 धावांनी एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ ॲडलेड कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. पर्थ कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने ॲडलेड कसोटी सामन्यासाठी आपल्या प्लेइंग 11 जाहीर केली असुन संघात एक बदल केला आहे. त्यांचा सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे ॲडलेड कसोटीपूर्वी बाहेर पडला होता. आता त्याच्या जागी दुसऱ्या कसोटीच्या एक दिवस आधी यजमान संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत स्कॉट बोलंडचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केल्याची पुष्टी केली आहे.

भारताविरुद्धच्या पिंक बाॅल कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची प्लेंइग 11

उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन,.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)