क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) बुधवारी भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दोन्ही संघात असे अनेक खेळाडू आहेत जे बुधवारी आपल्या संघाला विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ज्यासाठी खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धाही पाहायला मिळते. या सामन्यात कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील संघर्षाबद्दल चाहते आधीच उत्सुक आहेत. दरम्यान, भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. तुम्ही या सामन्याचे Disney + Hotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
After a thumping win against Australia, #TeamIndia await second hurdle in the form of Afghanistan in a quest to the #GreatestGlory! 💪🏻💙
Will the Men in Blue make it 2/2? 👀
Tune-in to #INDvAFG in the #WorldCupOnStar
Today | Star Sports Network#CWC23 #Cricket pic.twitter.com/JmZ9GqyDnI
— Star Sports (@StarSportsIndia) October 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)