Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात हुंड्याची मागणी वराला आणि त्याच्या कुटुंबीयांना चांगलीचं महागात पडली आहे. सासरवाडीतील लोकांनी वराला झाडाला बांधून ठेवत त्याच्या नातेवाईकांना ओलीस ठेवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही पक्षांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात नेलं आहे. बुधवारी रात्री जौनपूर येथून मांधाता भागातील हरखपूर येथे मिरवणूक आली होती. वरमाळा दरम्यान अचानक वराने हुंड्याची मागणी सुरू केली. यामुळे वधूच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सुरुवातीला लोकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ठाम राहिल्याने संतप्त कुटुंबीयांनी वर अमरजीतला झाडाला बांधले. यासोबतच वराचे अनेक नातेवाईक आणि वऱ्हाड्यांनाही कोंडून ठेवण्यात आले होते. त्यामुळे लग्नस्थळी गोंधळ उडाला.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना सोबत घेतले. पोलीस ठाण्यात दिवसभर यासंदर्भात गोंधळ सुरू राहिला. मात्र निकाल लागला नाही. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (हेही वाचा - No Mutton No Marriage: वऱ्हाडाला मटण पडलं अपूर; वऱ्हाडी मंडळींनी आणखी मटणाची मागणी केल्याने वधूने मोडलं लग्न)
प्रतापगढ़
➡दहेज मांगने पर दूल्हे को पेड़ से बांधा
➡दूल्हे के रिश्तेदारों को भी बनाया गया बंधक
➡जयमाल के बाद दहेज को लेकर हुआ विवाद
➡जौनपुर जिले के सुजानगंज से आई थी बारात
➡दूल्हे को पेड़ से बांधने का वीडियो हुआ वायरल
➡सूचना पर पहुंची पुलिस मामले की जांच में जुटी… pic.twitter.com/oA6BcCsNSX
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) June 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)