Lok Sabha Election 2024: 'भेटवस्तूंऐवजी मोदींना मत द्या'! लग्नपत्रिकेवर PM Modi यांचा प्रचार करणे पडले महागात, वधू-वरांवर गुन्हा दाखल
या आवाहनानंतर निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी संनियंत्रण पथकाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरावर गुन्हा दाखल केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक प्रचाराच्या अनोख्या पद्धती पाहायला मिळतात. सध्या पीएम मोदींसाठी मतदान करण्याबाबतचे एक आवाहन चर्चेत आले आहे. कर्नाटकमध्ये वधू-वराने आपल्या लग्नाच्या कार्डावर पंतप्रधान मोदींना मत देण्याचे आवाहन केले होते. मात्र जेव्हा पोलिसांना या कार्डबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी वधू-वरांविरुद्ध एफआयआर नोंदवला. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत वधू-वरांनी लिहिले होते की, ‘यावेळी पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणे ही वधू-वरांसाठी भेट असेल, कारण आपला भावी भारत सुरक्षित असावा असे आम्हास वाटते.’ या आवाहनानंतर निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी संनियंत्रण पथकाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरावर गुन्हा दाखल केला आहे.
याआधी तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात असेच एक प्रकरण समोर आले होते, जिथे वराच्या वडिलांनी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर पाहुण्यांना भेटवस्तू आणण्याऐवजी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्या निमंत्रण पत्रात पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रासोबत ‘नरेंद्र मोदींना मतदान करणे हीच सर्वोत्तम भेट असेल’ असे लिहिले होते. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024: 400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही - अमित शाह)
पहा पोस्ट -
Karnataka bride, groom land into legal trouble after appealing 'Vote For Modi' as wedding gift on card#Karnataka #Bride #Groom #news #Topindiannews https://t.co/NTz2o81jmU
— Top Indian News (@topindiannews_) April 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2024 11:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

