सध्या देशात अनेक कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप होत आहे. गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरु असून अद्याप याबाबत केंद्र सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना हटवण्यासाठी पोलिसांच्या दाबवाचाही वापर केला गेला मात्र, कुस्तीपटू आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आता या मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. पीएम नरेंद्र मोदी यांनी या विषयात लक्ष घालून सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावे अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.

याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, 'सन्मा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती.' (हेही वाचा: जागतिक पातळीवर पोहोचले कुस्तीपटूंचे आंदोलन; United World Wrestling ने दिला पाठींबा, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियावर बंदी घालण्याची धमकी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)