रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटू निदर्शने करत आहेत. याप्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी कुरुक्षेत्र येथे खाप महापंचायत झाली. याआधी गुरुवारी (1 जून) यूपीच्या मुझफ्फरनगरमध्येही महापंचायत झाली, मात्र त्यात कोणताही ठराव होऊ शकला नाही. आता शुक्रवारी (2 जून) झालेल्या महापंचायतीनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारला 9 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. तो पर्यंत सिंग यांना अटक झाली नाही, तर 9 जूननंतर पैलवानांना घेऊन जंतरमंतरवर जाऊ आणि देशभरात पंचायती घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. राकेश टिकैत म्हणाले की, आम्ही कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी देशभरात खाप पंचायतींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. शामलीमध्ये 11 जून आणि हरिद्वारमध्ये 15 ते 18 जून दरम्यान पंचायत होणार आहे. जर 9 जून रोजी जंतरमंतरवर बसू दिले नाही तर आंदोलनाची घोषणा केली जाईल, अशी घोषणा खाप नेत्यांनी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ बैठकीनंतर केली.
(हेही वाचा: कुस्तीपटूंच्या आंदोलनासमर्थनार्थ आयोजित Khap Panchaya मध्ये हाणामारी)
#WATCH | Haryana: We have taken a decision that Govt must address the grievances of wrestlers and he (Brij Bhushan Sharan Singh) should be arrested otherwise we will go with wrestlers to Jantar Mantar, Delhi on June 9 and will hold panchayats across the nation: Farmer leader… pic.twitter.com/dEnpTr4TmL
— ANI (@ANI) June 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)