पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक विविध पर्यटनस्थळांना भेटी देत असतात. मात्र या काळात समुद्र, नदी, तलाव किंवा धबधबा अशा ठिकाणी अनेक अपघात घडण्याचीही शक्यता असते. आता बुडणे आणि इतर जीवघेण्या घटना टाळण्यासाठी खारघर पोलिसांनी पर्यटकांना खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर जाण्यास मनाई केली असून, या ठिकाणी कलम 144 लागू केले आहे. खारघर पोलिसांनी पांडवकड्याच्या बाहेर सूचना फलक लावले असून, लोकांना धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर पावसाळ्यात पर्यटकांनी प्रवेश करू नये यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारी सुट्टीचा दिवस असल्याने, या ठिकाणच्या 110 हून अधिक लोकांना पोलीस कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. पांडवकडा धबधबा पावसाळ्यात ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे. (हेही वाचा: Nalasopara Shocker: विहिरीत पोहायला जाणे बेतले जीवावर, नालासोपारा येथे दोन तरुणांचा मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)