Navratri 2022: मुंबईत नवरात्रोत्सव 2022 ची तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टने जादा बसेस सुरू करण्याची घोषणा केली आहे. बेस्टच्या निवेदनानुसार 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत 26 अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार आहेत. गरबा आणि देवी दर्शनासाठी शहरात येणाऱ्या भाविकांना रात्रीच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बेस्टने अतिरिक्त हॉप-ऑन-हॉप-ऑफ बस सेवा जाहीर केल्या आहेत.

बेस्टने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ओपन डेक बस सेवा संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत किंवा वाहतूक थांबेपर्यंत चालविली जाईल. म्हणजेच रात्री उशिरा गरबा किंवा नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांना ये-जा करताना कोणतीही अडचण येणार नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)