Mumbai BEST Bus Revised Fare: मुंबई मध्ये बेस्ट बसची दरवाढ आजपासून लागू; पहा AC, Non AC बसच्या तिकीटांचे दर
मुंबई लोकल नंतर मुंबईकरांची अधिक पसंती बेस्ट बस सेवेला आहे. आजपासून मुंबई मध्ये तिकिटाचे दर दुप्पट झाले आहेत.
मुंबई मध्ये बेस्ट बसची दरवाढ आजपासून लागू केली जाणार आहे. नव्या दरापत्रकानुसार, आजपासून मुंबईत एसी बसचं किमान तिकीट 6 रूपयांवरून 12 रूपये करण्यात आले आहे. नॉन एसी बस मध्ये किमान तिकीट 10 रूपये झाले आहे. तर 5-12 वयाच्या प्रवाशांना हाफ तिकीट विकत घ्यावं लागणार आहे. दिवसाचा ट्रॅव्हल पास आता 75 रूपये आणि महिन्याचा 1800 रूपये झाला आहे. नवीन भाडे वाढ मध्ये 50 किमी पर्यंतच्या 5 किमी स्लॅबमध्ये भाडे लागू केले जाईल आणि प्रत्येक स्लॅबमध्ये 5 रुपये वाढ होईल.
बेस्ट बसचे आजपासून लागू नवे तिकीट दर
Following are the details of the Revised Bus Fare w.e.f. 09.05.2025 https://t.co/pZQ49xFqWz pic.twitter.com/OrslWnTSXR
— BEST Bus Transport (@myBESTBus) May 8, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2025 09:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

