मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती' या प्रणालीचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत करुन त्यांच्या सुलभ प्रवासाच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या वेळी कोणती बस उपलब्ध होईल, ती मिळण्याची अचूक वेळ या गोष्टी सहजतेने आता उपलब्ध असणार आहेत. बेस्ट आणि गुगल मॅप यांच्यातील हे सहकार्य मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही सेवा मराठी व हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. या सुविधेमुळे बेस्टच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होईल. प्रवाश्यांना या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी प्रत्येक बसस्थानकावर या सुविधेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. (हेही वाचा: BEST To Redesign 32 Bus Routes: मुंबईकरांनो लक्ष द्या! मेट्रो लाईन 3 ची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बेस्ट 2025 मध्ये करणार 32 मार्गांचे पुनर्रचन, भाडेवाढ प्रस्तावित)
Best Bus on Google Maps:
मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती' या प्रणालीचे उदघाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांसमवेत संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)