यंदा राम नवमीचा उत्सव 6 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला राम नवमी हा सण साजरा केला जातो. भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस देशभरात उत्साहाने साजरा होतो. या वर्षी नवमी तिथी 5 एप्रिलला संध्याकाळी 7.26 वाजता सुरू होईल आणि 6 एप्रिलला संध्याकाळी 7.22 वाजता संपेल. त्यामुळे यंदा 6 एप्रिलला राम नवमी साजरी होईल. साई बाबांच्या शिर्डीतही दरवर्षी रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, जो साईबाबांच्या भक्तांसाठी महत्त्वाचा सण आहे. हा उत्सव तीन दिवस चालतो. माहितीनुसार 1911 पासून साईबाबांनी स्वतः राम नवमी साजरी करण्यास सुरुवात केली, आणि तेव्हापासून ही परंपरा अखंड चालू आहे. या वर्षी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने 5 एप्रिलपासून तीन दिवसांचा उत्सव आयोजित केला आहे. अभिषेक, भजन, कीर्तन आणि अन्नदान हे या सणाचे मुख्य भाग आहेत.

आता श्री साई बाबा संस्थानने श्रीराम नवमी उत्सवाचे 5 ते 7 एप्रिल दरम्यानचे कार्यक्रम वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये कीर्तन, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. तीनही दिवस विक्रम महाराज नांदेडकरांचे कीर्तन होणार आहे. यासह दररोज विविध मान्यवरांचे भजन व अध्यात्म संगीत कार्यक्रम होणार आहे. (हेही वाचा: Ram Navami 2025 Date: जाणून घ्या यंदा कधी आहे रामनवमी; या दिवसाचे महत्व व मध्याह्न मुहूर्त)

पहा शिर्डी सी बाबा संस्थानचे श्रीराम नवमी उत्सवाचे संपूर्ण वेळापत्रक-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)