मुंबईच्या भांडुप पश्चिम येथे शनिवारी एका 16 वर्षीय मुलाने तलवारीने बेस्ट बस, ऑटोरिक्षा आणि पाण्याच्या टँकरचे नुकसान केल्याची घटना घडली. या मुलाने तीनही वाहनांवर तलवारीने हल्ले केले. महत्वाचे म्हणजे हल्ल्याच्या वेळी बसमध्ये प्रवासी उपस्थित होते. मुलाला त्याच्या काकांनी फटकारल्यानंतर संतापाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी बस चालकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून, भांडुप पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. मुलगा वाहनांवर हल्ले करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप पश्चिम येथील टँक रोडवरील मिनीलँड सोसायटी येथे दुपारी 3.10 ते 3.25 च्या दरम्यान ही घटना घडली. काकांनी रागावल्यानंतर तो तलवार घेऊन आला व त्याने बेस्ट बस चालकाला धमकावले आणि शिवीगाळ करत तलवारीने गाडीच्या काचा फोडल्या. बसचे अंदाजे 70,00 रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर त्या मुलाने जवळच उभ्या असलेल्या ऑटोरिक्षा आणि एका पाण्याच्या टँकरचे नुकसान केले. भांडुप पश्चिमेकडील त्रिवेणी संगम येथील रहिवासी असलेला अल्पवयीन आरोपी हा गुन्हेगार असल्याचे ज्ञात आहे. गेल्या वर्षी त्याच पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तीन गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ज्यात एक खुनाचा प्रयत्न केल्याचा समावेश होता. (हेही वाचा: Shirish Valsangkar Suicide: सोलापूर मधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या; सामान्य नागरिकापासून हॉस्पिटल कर्मचार्यांनी व्यक्त केली हळहळ)
𝔹ℍ𝔸ℕ𝔻𝕌ℙ | Under the jurisdiction of the Mumbai Police Commissionerate, within the limits of the @BhandupPS , in the Valmiki Nagar (Tank Road) area, a young man openly wielded a sword and vandalized several vehicles, including buses, cars, and trucks. This act has instilled… pic.twitter.com/JV093y7Atj
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) April 19, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)