पाठिमागीलकाही दिवसांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या शहरांतील तापमान सलग वाढते आहे. हे तापमान असेच चढे राहिले तर सन 2024 या वर्षात या शहरांतील सर्वोच्च तापमानाची नोंद यंदा होऊ शकते. त्यासोबतच तापमान तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने उष्णतेच्या लाटेचा संभव असल्याचेही हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर काही हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज आणि प्राप्त अहवालानुसार, शहरात रविवार, 14 एप्रिल, ते बुधवार, 17 एप्रिल या कालावधीत उष्णतेची तीव्र लाट जाणवेल आणि तापमान 40 अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक असेल.

दरम्यान, विद्यमान आठवडा हा "एप्रिल 2024 चा सर्वात उष्ण आठवडा" म्हणूनही ओळखला जाऊ शकतो. मंगळवार, 16 एप्रिल रोजी मुंबईत हंगामातील पहिले 40-अंश सेल्सिअस तापमान पाहावे लागेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. X वरील स्थानिक हवामान तज्ज्ञ म्हणाले, "मुंबईला पुढील 72 तासांत सर्वात वाईट हवामानाचा सामना करावा लागेल". सांताक्रूझमध्ये तापमान 38-39 अंश सेल्सिअस, ठाण्यात 42 अंश सेल्सिअस, नवी मुंबईत 41 अंश सेल्सिअस आणि कल्याणमध्ये 43 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मुंबईसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यासह उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान उन्हात जाणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)