माजी महापौर आणि शिवसेना (यूबीटी) नेते दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असल्याचे विक्रोळी पोलीसांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जाहीर सभेतून आक्षेपार्ह वक्तव्य केले प्रकरणी दळवी यांना मुंबई पोलिसांनी कालच अटक केली आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात जोरदार संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही गटातील नेत्यांनी परस्परांवर जोरदार टीका केली आहे. हा संघर्ष अजूनही थांबला नाही. प्रसारमाध्यमांतून दोन्ही गट एकमेकांवर जोरदार आरोप करताना दिसत आहेत. (हेही वाचा, Datta Dalvi Arrested: दत्ता दळवी यांना अटक, शिवसेना (UBT) गटाचे कार्यकर्ते आक्रमक; CM एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अश्लील भाषा वापरल्याचा आरोप)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)