Mumbai Rain Update: गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस थोडा थंडावला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असल्याचे दिसत आहे. कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिमझिम सुरु झाली आहे. आता संपूर्ण मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24-25 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज राज्यभरात विजांसह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागांमध्ये मंगळवारपर्यंत वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (हेही वाचा: Mumbai Monsoon-Related Diseases: मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, एच1एन1 रुग्णांमध्ये वाढ; BMC ने जारी केल्या आरोग्य सुचना)

मुंबईत 24-25 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)