कोकणात जाणार्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र पावसाळी विधिमंडळ अधिवेशनामध्ये आज राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत 3 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातील खड्डे 25 ऑगस्टपर्यंत बुजवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. सोबतच बहुप्रतिक्षित गोवा महामार्ग पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करणार असल्याची आणि परशुराम घाटातील रस्त्याची समस्या मे २०२३ पर्यंत दूर करणार असल्याची माहिती दिली आहे.
पहा ट्वीट
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत दिलेली आश्वासने
- गोवा महामार्ग पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करणार
- परशुराम घाटातील रस्त्याची समस्या मे २०२३ पर्यंत दूर करणार @MahaDGIPR
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)