Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. याआधी नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि नेते अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आता या ठिकाणी हेमंत गोडसे विरुद्ध राजभाऊ वाजे अशी लढत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. याआधी लोकसभेसाठी शिवसेनेकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश गणपत म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली होती. (हेही वाचा: Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून Ravindra Waikar यांना उमेदवारी)
पहा पोस्ट-
लोकसभा निवडणूक - २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/R8Ykv8WUXs
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)