Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून Ravindra Waikar यांना उमेदवारी
रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्वचे आमदार आहेत. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात यंदा मे महिन्यात मतदान होणार आहे. मतदानाची तारीख 20 मे (टप्पा 5) आहे.
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्वचे आमदार आहेत. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात यंदा मे महिन्यात मतदान होणार आहे. मतदानाची तारीख 20 मे (टप्पा 5) आहे. या ठिकाणी शिवसेना (UBT) कडून अमोल कीर्तिकर यांना तिकीट देण्यात आले आहे. या जागेवर 2019 च्या निवडणुकीमध्ये गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसच्या संजय निरुपमांचा पराभव केला होता. मात्र पुढे शिवसेनेतल्या फुटीनंतर विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर शिवसेना शिंदे गटात गेले. तर त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर ठाकरे गटातच राहिले. आता ठाकरे गटाने लोकसभेसाठी या जागेवर अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. (हेही वाचा: Amit Shah Deepfake Video Case: महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर गुन्हा दाखल; अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ केला होता शेअर)
पहा पोस्ट-
लोकसभा निवडणूक - २०२४ साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री रवींद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena pic.twitter.com/4Djv0JORaU
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) April 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2024 11:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

