Solapur Lok Sabha Election 2024: मतदान (Voting) करण्यासाठी सकाळी ७ वाजेपासून दक्षिण सोलापूर मतदार संघातील नागरिकांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. मात्र, मतदानाला सुरुवात होताच अवघ्या तासाभरातच ईव्हीएम मशीन(EVM Machine)मध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे नागरिक संतापले आहेत. माजी सहकार मंत्री आणि सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख हे देखील मतदानासाठी खोळबंले होते. मशीन दुरुस्तीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी देखील इथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या होत्या. (हेही वाचा:Ahmednagar News: निवडणूकीच्या धामधुमीत अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)