Priyanka Chaturvedi On EVM Machine Scam: मतमोजणी केंद्रावर फोन वापरणे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या नातेवाईकाला महागात पडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वायकर यांच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 4 जून रोजी गोरेगाव येथील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेदरम्यान मतमोजणी केंद्रात केलेल्या कथित कृत्याबद्दल मंगेश पांडिलकर यांच्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आता याप्रकरणी उद्धव ठाकरे गट शिवसेना राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी निवडणुक आयोगाला या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाला मतमोजणी केंद्रात आणलेल्या फोनमध्ये ईव्हीएम मशीन अनलॉक करण्याची क्षमता असल्याचा दावाही चतुर्वेदी यांनी केला आहे. निवडणुक आयोगाने यात हस्तक्षेप केला नाही तर चंदीगड महापौर निवडणुकीनंतरचा हा सर्वात मोठा निवडणूक निकाल घोटाळा ठरेल आणि हा लढा कोर्टात जाईल. या निर्लज्जपणाला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. (हेही वाचा -Mumbai: नवविर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?)

प्रियंका चतुर्वेदी ट्विट -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)