West Bengal Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024 चे सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. पश्चिम बंगालच्या जयनगर लोकसभा मतदारसंघातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त जमावानी मतदार केंद्रावर असलेल्या एव्हीएम मशीन तलावात फेकल्या आहेत. ही घटना जयनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा येथील कुलताली येथील मतदान केंद्र क्रमांक 40 आणि 41 केंद्रावरील आहे. स्थानिकांना मतदान करून दिले नाही म्हणून संतप्त जमावाने त्यांनी ईव्हीएम घेऊन ते तलावात फेकले. एकाने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. (हेही वाचा- लोकसभेच्या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पवन खेरा यांची घोषणा)
South 24 pargana Kultali which falls under Joynagar Loksabha constituency locals have thrown EVM in pond .
Locals not allowed to cast vote that’s why they have taken EVM and thrown those in pond@ECISVEEP @SpokespersonECI @KamalikaSengupt Reports pic.twitter.com/V8ND95euwB
— nikesh singh (@nikeshs86) June 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)