Pawan Khera (PC - Facebook)

Lok Sabha Exit Poll 2024: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. याआधी सार्वत्रिक निवडणुकीसाठी देशभरात सहा टप्प्यात मतदान झाले आहे. अशा परिस्थितीत सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर शनिवारी संध्याकाळी एक्झिट पोल (Exit Poll 2024) येतील. त्यासंदर्भात प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. काँग्रेस टीव्हीवरील एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होणार नाही, असं काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा (Pawan Khera) यांनी जाहीर केले.

काँग्रेसने टेलिव्हिजन वाहिन्यांवरील कोणत्याही लोकसभा एक्झिट पोलच्या चर्चेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि टीआरपीसाठी सट्टा आणि स्लगफेस्टमध्ये गुंतू इच्छित नाही, असं म्हटलं आहे. 4 जून रोजी निकाल लागतील. त्यापूर्वी, आम्हाला टीआरपीसाठी सट्टा आणि स्लगफेस्टमध्ये गुंतण्याचे कोणतेही कारण दिसत नाही, असे पवन खेडा यांनी आपल्या X वर शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा -Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या काळात आयकराने विभागाने जप्त केली 1,100 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि दागिने; 2019 तुलनेत यंदा 182 टक्क्यांनी वाढ)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एक्झिट पोलवरील वादविवादांमध्ये भाग घेणार नाही. कोणत्याही वादाचा उद्देश लोकांना माहिती देणे हा असावा. आम्ही 4 जूनपासून चर्चेत आनंदाने भाग घेऊ, असे खेरा यांनी निवेदनात पुढे नमूद केलं आहे. पक्षांतर्गत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचंही खेरा यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्या अंतिम टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. यानंतर, तो क्षण येईल ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे, म्हणजे एक्झिट पोल. 4 जूनला निकाल जाहीर होणार असला तरी लोक अजूनही एक्झिट पोलची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या पाच वर्षांत देशाची धुरा कोणाकडे जाणार आहे, हे या सर्वेक्षणातून बऱ्याच अंशी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदाचा एक्झिट पोल पाहणं नागरिकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.