Shivsena UBT: अनिल परब (Anil Parab) यांनी यावेळी मतमोजणी केंद्रातील संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. हा पराभव अत्यंत संशयास्पद आहे. आम्ही या विरोधात येत्या 2-3 दिवसांत कोर्टात जाणार आहोत. निवडणूक आयोगाकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना विजयी घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अमोल कीर्तिकर यांच्या १९ व्या फेरीनंतर मतमोजणीत अनियमितता सुरू झाली. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर ईव्हीएम मतमोजणीच्या टेबलाजवळ एक एआरओ अधिकारी असतो, एआरओला अंतिम माहिती दिली जाते, परंतु मोजणीच्या 19 फेऱ्या झाल्यानंतरही एआरओला माहिती देण्यात आली नव्हती. निवडणूक अधिकाऱ्याच्या फोनवर वारंवार येणारे कॉल्समुळे ते वारंवार वॉशरूममध्ये जात होते. कोणाचा फोन आला हे आम्हाला माहीत आहे. आतापर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दिलेले नाही, असे अनिल परब पत्रकार परिषदेत म्हणाले. (हेही वाचा:North West Mumbai Lok Sabha Result 2024: अमोल कीर्तीकरांकडून मतमोजणी केंद्रावरील EVM मध्ये छेडछाड केल्याची तक्रार दाखल; कोर्टातही मागणार दाद )
Mumbai | Shiv Sena (UBT) leader Anil Parab says, "Irregularities in vote counting started after Amol Kirtikar's 19th round. There are a total of 14 tables for counting on each MP's seat. There is an ARO officer near each EVM counting table after each round of counting, the final… pic.twitter.com/qAkAB3U30Z
— ANI (@ANI) June 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)