मुंबईहून गोव्याला गेलेल्या कॉर्डेलिया क्रूझवर 66 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर हे जहाज परत मुंबईला आले व इथे बीएमसीने सर्व प्रवाशांची चाचणी घ्यायला सुरुवात केली. आतापर्यंत, कॉर्डेलिया क्रूझवरील एकूण 1,827 प्रवाशांपैकी 123 प्रवाशांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 832 नमुन्यांच्या चाचणी निकालाची प्रतीक्षा आहे. कॉर्डेलिया क्रूझमधील कोविड-19 पॉझिटिव्ह प्रवाशांना मुंबईतील भायखळा येथील रिचर्डसन आणि क्रुडास कोविड केअर सेंटरमध्ये हलवले जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली.
Mumbai | Till now, 123 passengers out of the total 1,827 passengers on the Cordelia cruise have tested positive for COVID19. The test result of 832 samples is awaited: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) pic.twitter.com/zEhUVNehKP
— ANI (@ANI) January 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)