काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास होत आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे हे काल, 10 नोव्हेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून दोन ते तीन दिवस उपचार घेणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या दरम्यान सोशल मिडियावर बातमी व्हायरल झाली होती की, मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रांती यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजेस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)