Hyderabad: हैदराबादमधील एका डॉक्टरला नुकतेच ड्रग्ज (Drugs) घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीची ओळख नम्रता चिगुरुपती (34) अशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. नम्रता चिगुरुपती ओमेगा हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि त्या हॉस्पिटलच्या सीईओ देखील आहेत. आरोपी महिलेला कोकेनचे (Cocaine) व्यसन होते आणि ती मुंबईतील एका पुरवठादाराकडून ड्रग्ज मिळवत होती. रायदुर्गम पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर सीएच वेंकन्ना यांनी सांगितले की, डॉ. नम्रता मुंबईहून वंश धाक्कर यांच्याशी व्हाट्सअॅपद्वारे संपर्क साधला आणि 5 लाख रुपयांच्या कोकेनची ऑर्डर दिली. तिने ही रक्कम ऑनलाइन भरल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सांगितले की, वंश यांच्याकडे काम करणारा डिलिव्हरी एजंट बालकृष्ण उर्फ रामप्यार राम (38) याच्यामार्फत हे ड्रग्ज हैदराबादला पोहोचवण्यात आले होते. गुरुवारी, 8 मे रोजी, रायदुर्गम पोलिसांनी नम्रता आणि बालकृष्ण या दोघांनाही ड्रग्ज हस्तांतरित करताना अटक केली. पोलिसांनी 53 ग्रॅम कोकेन जप्त केले.
డ్రగ్స్ తీసుకుంటూ పోలీసులకు రెడ్ హ్యాండెడ్గా దొరికిన మహిళా డాక్టర్, ఒమేగా హాస్పిటల్ సీఈవో చిగురుపాటి నమ్రత
ముంబైకి చెందిన వంశ్ టక్కర్ అనే స్మగ్లర్ నుంచి కొకైన్ కొనుగోలు చేస్తూ.. తన నివాసం షేక్పేట్లోని అపర్ణ వన్ అపార్ట్మెంట్లో దొరికిన చిగురుపాటి నమ్రత
వంశ్ టక్కర్కు… pic.twitter.com/A03UqI0JvZ
— Telugu Scribe (@TeluguScribe) May 10, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)