Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातानंतर आतापर्यंत तब्बल 265 मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले; पोलीस अधिकाऱ्याची माहिती
एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानीनगर नगर भागात, टेकऑफ झाल्यानंतर काही क्षणांतच कोसळले. विमानात एकूण 242 लोक होते, ज्यात 12 क्रू मेंबर्सचा समावेश होता.
गुरुवारी दुपारी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघातानंतर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तब्बल 265 मृतदेह आणण्यात आले आहेत, असे एका पोलीस पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ‘आम्हाला मिळालेल्या संदेशानुसार 265 मृतदेह रुग्णालयात पोहोचले आहेत, असे पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी पत्रकारांना सांगितले. एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानीनगर नगर भागात, टेकऑफ झाल्यानंतर काही क्षणांतच कोसळले. विमानात एकूण 242 लोक होते, ज्यात 12 क्रू मेंबर्सचा समावेश होता. विमान उड्डाणानंतर लगेचच मेघानीनगर परिसरातील बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या निवासी भागात कोसळले. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे. (हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे एअर इंडिया विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित; जाणून घ्या नंबर्स)
Ahmedabad Plane Crash:
STORY | Ahmedabad plane crash: 265 bodies brought to civil hospital, says police official
READ: https://t.co/1kdgCZa43I pic.twitter.com/Zi8w44YqQj
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 12:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

