Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे एअर इंडिया विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित; जाणून घ्या नंबर्स
या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत, नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
अहमदाबाद-लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील मृत आणि नातेवाईंकांप्रति संवेदना प्रकट केली आहे. अनेकांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले आहेत. काळाने घातलेली ही झडप अनेक कुटुंबियांसाठी शब्दांच्या पलिकडली आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सर्व, महाराष्ट्राची जनता सहभागी आहे. त्यांना या दुःखद आघातातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वचरणी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत, नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या विमान अपघातात प्रभावित झालेल्या प्रवाशांचे नातेवाईक व संबंधित नागरिकांनी आवश्यक माहिती आणि साहाय्यासाठी ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९ भ्रमणध्वनी ९३२१५८७१४३, आपत्कालीन मदत क्रमांक १०७० या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी केले आहे. (हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना Tata Group देणार 1 कोटींचे आर्थिक साहाय्य)
Ahmedabad Plane Crash:
#अहमदाबाद येथील AI171 या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर, अहमदाबाद येथील खालील आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.#PlaneCrash #AirIndiaFlightCrash #AirindiaPlane #AhmedabadPlaneCrash https://t.co/TCAiBWt9Rg
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 12, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 11:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

