Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना Tata Group देणार 1 कोटींचे आर्थिक साहाय्य
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. एअर इंडिया ही टाटा ग्रुपची मालकीची आहे.
Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान गुरुवारी (12 जून) दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनानी नगर भागात, टेकऑफ झाल्यानंतर काही क्षणांतच कोसळले. विमानात एकूण 242 लोक होते, ज्यात 12 क्रू मेंबर्सचा समावेश होता. या अपघातात 241 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता टाटा ग्रुपने जाहीर केले आहे की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. एअर इंडिया ही टाटा ग्रुपची मालकीची आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘या कठीण काळात शब्द अपुरे पडत आहेत. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत आणि जखमी झालेल्या कुटुंबांसोबत आमच्या संवेदना आहेत.’
जखमी प्रवाशांच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही टाटा ग्रुप उचलेल आणि त्यांना आवश्यक असलेली सर्व वैद्यकीय सुविधा पुरवली जाईल. याशिवाय, अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या पुनर्बांधणीसाठीही टाटा ग्रुप मदत करेल. या कठीण काळात ते बाधित कुटुंबे आणि समुदायांसोबत खंबीरपणे उभे असल्याचे कंपनीने म्हटले आहे. (हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: 'आम्ही Air India च्या संपर्कात आहोत'; अहमदाबाद अपघातावर विमान उत्पादक कंपनी Boeing Airplanes ची पहिली प्रतिक्रिया)
Ahmedabad Plane Crash:
We are deeply anguished by the tragic event involving Air India Flight 171.
No words can adequately express the grief we feel at this moment. Our thoughts and prayers are with the families who have lost their loved ones, and with those who have been injured.
Tata Group will…
— Tata Group (@TataCompanies) June 12, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 08:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

