दक्षिण मुंबई मध्ये पेडर रोड वर जसलोक हॉस्पिटल जवळ असलेल्या Riyaz Gangji Libas boutique या डिझायनर बुटिकला आज सकाळी आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. आगीचं वृत्त समजताच 5-6 फायर टेंडर्स घटनास्थळी पोहचले. मुंबई अग्निशमन दलाने सुरुवातीला सकाळी 7 च्या सुमारास ही आग लेव्हल-१ ची असल्याचे घोषित केले होते, परंतु आगीची तीव्रता पाहता सकाळी 7.35 वाजता ती लेव्हल-२ मध्ये पोहचली. अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. अधिकारी सध्या नुकसानीची तपासणी करत आहेत.
Riyaz Gangji Libas boutique ला आग
— Free Press Journal (@fpjindia) May 5, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)