अहमदाबाद-लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील मृत आणि नातेवाईंकांप्रति संवेदना प्रकट केली आहे. अनेकांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले आहेत. काळाने घातलेली ही झडप अनेक कुटुंबियांसाठी शब्दांच्या पलिकडली आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सर्व, महाराष्ट्राची जनता सहभागी आहे. त्यांना या दुःखद आघातातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वचरणी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत, नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या विमान अपघातात प्रभावित झालेल्या प्रवाशांचे नातेवाईक व संबंधित नागरिकांनी आवश्यक माहिती आणि साहाय्यासाठी ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९ भ्रमणध्वनी ९३२१५८७१४३, आपत्कालीन मदत क्रमांक १०७० या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी केले आहे. (हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना Tata Group देणार 1 कोटींचे आर्थिक साहाय्य)

Ahmedabad Plane Crash:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)