आयपीएल गाजवणार 14 वर्षीय वैभव सुर्यवंशीने पु्न्हा आपल्या वादळी खेळीने सगळ्यानां चकीत केले आहे. इंग्लंड दौऱ्यापुर्वी भारतीय U-19 संघाकडून सराव सामन्यात वैभवने 90 चेडूंत 190 धावा केल्या. आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मोठ्या फटक्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या वैभवने येथेही आपली क्षमता सिद्ध केली. मिळालेल्या वृत्तानुसार, हा सामना बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळला गेला, जिथे वैभवने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आयपीएल 2025 मध्ये 'सुपर स्ट्रायकर'चा किताब जिंकणाऱ्या वैभवला अलीकडेच इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या अंडर-19 संघात समाविष्ट करण्यात आले आहे.

वैभव सूर्यवंशीने 90 चेंडूत 190 धावा फटकावल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)