Shani Shingnapur Temple Trust: शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; एकूण 167 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले, 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश
भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मंदिरात काम करणाऱ्या या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली होती आणि 14 जून रोजी निषेध जाहीर केला होता.
महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र शनि शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद वाढला होता. शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या व ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ काढून टाकावे अन्यथा 14 जून रोजी संपूर्ण हिंदू समाजाकडून मंदिराबाहेर मोठी रॅली काढली जाईल असा इशारा देण्यात आला. त्यानंतर आता शनि शिंगणापूर देवस्थानने मोठा निर्णय घेत, मंदिरात कार्यरत असलेल्या 167 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना अनुशासनहीनता आणि अनियमिततेच्या कारणावरून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय धर्म किंवा जातीवर आधारित नाही तर केवळ कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाच्या मुद्द्यावर आधारित आहे.
भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मंदिरात काम करणाऱ्या या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली होती आणि 14 जून रोजी निषेध जाहीर केला होता. नियोजित निषेधाच्या एक दिवस आधी, मंदिर ट्रस्टने बैठक घेऊन हा निर्णय घेतला. शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली.
Shani Shingnapur Temple Trust:
114 Muslim employees dismissed from Shani Shingnapur temple 🙏🏻 https://t.co/4vmnsjEi4l
— Facts (@BefittingFacts) June 13, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 05:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

