WTC 2025 Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद जिंकणारा संघ होणार मालामाल; उपविजेता संघही इतकी रक्कम घरी घेऊन जाणार
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप शेवटच्या टप्प्त आहे. कोणता संघ जिंकूण ट्रॉफी उंचावेल याकडे सर्वांच लक्ष लागल आहे. दरम्यान, दोन्ही संघ किती रक्कम जिंकतील हे जाणून घेऊयात.
WTC 2025 Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025) स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात खेळला जात आहे. कांगारू संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाच्या सामन्यासाठी तिकीट बुक केले आहे. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेने प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेतेपद जिंकणाऱ्या संघावर भरपूर पैशांचा वर्षाव होणार आहे. कसोटी क्रिकेटचा विजेता बनणाऱ्या संघाला 30.79 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या उपविजेत्या संघाला 17.96 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. गेल्या वर्षी विजेत्या संघाला 13.23 कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या संघाला 6.61 कोटी रुपये देण्यात आले होते. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाला आयसीसीकडून 12.31 कोटी रुपये मिळतील, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघाला 10.26 कोटी रुपये मिळतील.
It's exciting to announce that the winner of the #WTC25 Final between South Africa and Australia will earn $3.6M, with the runner-up to receive $2.1M. The increase in prize money exhibits our efforts to prioritize Test cricket and build on momentum from previous WTC cycles. @ICC pic.twitter.com/GMgWxM7GSb
— Jay Shah (@JayShah) May 15, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 08:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

