मुंबईतील वरळी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती BMC ने दिली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. अंबिका बिल्डर्स, शंकरराव पदपथ मार्ग, बीडीडी चाळ, हनुमान गल्ली येथे ही इमारत आहे. आज संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)