Sperm Count Study: भारतासह जगभरातील पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या संख्येमध्ये सातत्याने घट होत आहे. नुकतेच याबाबत एक महत्वाचे संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये दिसून आले आहे की, 1973 ते 2018 दरम्यान सरासरी शुक्राणूंची संख्या निम्म्याहून अधिक कमी झाली आहे. ह्युमन रिप्रोडक्शन अपडेट जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. प्रकाशनानुसार, संशोधकांना 1973 ते 2018 दरम्यान जगभरातील सरासरी शुक्राणूंची संख्या 51.6% कमी झाल्याचे आढळले. जागतिक स्तरावर, शुक्राणूंची संख्या 1973 मध्ये 104 दशलक्ष प्रति एमएल वरून 2018 मध्ये 49 दशलक्ष प्रति एमएल पर्यंत घसरली. या व्यतिरिक्त, प्रकाशन नोंदवते की 2000 नंतर ही घसरण अधिक तीव्र झाली. 1972 नंतर दर वर्षी घट 1.16% होती, मात्र 2000 नंतर वार्षिक घट 2.64% पेक्षा दुप्पट होती. शुक्राणूंची संख्या कमी होण्याची कारणे निश्चित करण्यासाठी पुढील संशोधन करणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Saree Cancer: भारतीय महिलांमध्ये वाढत साडी कर्करोगाचा धोका; जाणून घ्या काय आहे हा आजार व कशी घ्याल काळजी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)