Lalbaugcha Raja 2024 Live Streaming: लालबागचा राजा गणेशगल्लीच्या गणपती पाठोपाठ विसर्जनाला निघाला आहे. लालबाग वरून गिरगाव चौपाटीला जाऊन खोल समुद्रात लालबागच्या राजाचं विसर्जन केले जाते. यंदा लालबागच्या राजाचं 91 वं वर्ष आहे. मागील 10 दिवस बाप्पा भक्तांच्या सेवेमध्ये होता आणि आता तो निरोप घेण्यासाठी निघाला आहे. दरम्यान राजाची मिरवणूक ही मुंबई मध्ये 17-18 तास चालते. विसर्जनाला जाताना लालबाग भागात श्रॉफ़ बिल्डिंग वरून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी केली जाते. हा क्षण पाहण्यासाठी या भागात मोठी गर्दी असते. मागील दहा दिवसांमध्ये जे भाविक राजाचं दर्शन घेऊ शकले नाही त्यांना आज लालबाग ते गिरगाव दरम्यान रस्त्यात त्याचे दर्शन घेता येणार आहे. Mumbai Ganpati Visarjan Update: मुंबईत गणेश विसर्जनाची जय्यत तयारी, मिरवणुकीनिमित्त कोणते रस्ते राहणार बंद, जाणून घ्या, संपूर्ण माहिती.
लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक 2024 Live Streaming
मुख्यद्वारावर भाविकांची तुफान गर्दी
#WATCH | Mumbai, Maharashtra: Devotees gather in large numbers as the Lalbaugcha Raja Ganesh idol is being taken for visarjan pic.twitter.com/wmwa2kpDtt
— ANI (@ANI) September 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)