55th International Film Festival of India: दिग्दर्शक Navjyot Bandiwadekar यांना 'घरत गणपती' चित्रपटासाठी IFFI मध्ये प्राप्त झाला भारतीय फीचर फिल्म सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार
संपूर्ण भारतातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखण्यासाठी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इफ्फीच्या या आवृत्तीसाठी भारतीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक नव्याने सुरु केला आहे.
55th International Film Festival of India: गोव्यातील 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) 2024 मध्ये नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या 'घरात गणपती' या मराठी चित्रपटासाठी, भारतीय फीचर फिल्मचा सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार बांदिवडेकर यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणाचा प्रभाव अधोरेखित करतो. संपूर्ण भारतातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखण्यासाठी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इफ्फीच्या या आवृत्तीसाठी भारतीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक नव्याने सुरु केला आहे. 55 व्या इफ्फीच्या समारोप समारंभात नवज्योत बांदिवडेकर यांना प्रमाणपत्र आणि 5 लाखांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. या श्रेणीतील पाचही चित्रपटांचे पुनरावलोकन केल्यानंतर, ज्युरींनी त्यांच्या अपवादात्मक कामासाठी बांदिवडेकर यांची एकमताने निवड केली. (हेही वाचा: Aananddoh: कार्तिकी एकादशी दिवशी तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा)
नवज्योत बांदिवडेकर यांना IFFI मध्ये भारतीय फीचर फिल्म सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार-
दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना ‘#GharatGanpati’ या चित्रपटासाठी 55व्या #IFFI मध्ये भारतीय फीचर फिल्म सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला.#IFFI2024 #IFFI55 #TheFutureIsNow #NavjyotBandiwadekar@IFFIGoa @nfdcindia @MIB_India @PIB_India @ddsahyadrinews @airnews_mumbai pic.twitter.com/bpUApiF93r
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) November 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2024 08:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

