Viral Video: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे कार स्टंट करणं महाग पडलं आहे. कार स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेअंतर्गत चालकाला अटक केले आहे. आणि करा ही जप्त करण्यात आली आहे. ही घटना हजरतगंजमधील लाल चौकात घडली आहे. कार चालक कार सोबत धोकादायक स्टंट करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, अटल चौकात रस्त्याच्या मधोमध त्याने कार फिरवली. ही घटना शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी घडली. रत्यावर उभ्या असलेल्या लोकांनी हा स्टंट करणाऱ्या व्यक्तीला व्हिडिओ कॅमेरात कैद केला.
थाना हजरतगंज पुलिस टीम द्वारा सोशल मीडिया वायरल विडियो में कार से स्टंट करने वाला कार सवार अभियुक्त गिरफ्तार, 01 अदद कार सीज।#UPPolice #Lkopolice_On_Duty pic.twitter.com/v0yAiMIg9E
— LUCKNOW POLICE (@lkopolice) February 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)