Delhi Liquor Policy Scam: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत जामीन मंजूर केला. केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर लोकसभा निवडणूकीत प्रचार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे आम आदमी पक्षात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात सामील होण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी याचिका जारी केली होती. तर आज या याचिकेवर न्यायाधीश संजीव दत्ता आणि दीपंकर दत्ता यांनी खंडपीठासमोर सुनावणी केली. दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलं होते. (हेही वाचा- नंदूरबारच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर पुन्हा हल्ला)
Delhi excise policy case: Supreme Court says it’s passing order on grant of interim bail to Delhi CM Arvind Kejriwal till June 1. pic.twitter.com/lyOLH8qGF1
— ANI (@ANI) May 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)