Nuh Shocker: हरीयाणातील नूह मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लहावास गावाजवळील कालव्यात एका नवजात मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. आईने आपल्या नवजात मुलीला कालव्यात फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे. कालव्यात मुलीचा मृतदेह पाहून स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली असून लोकांनी या अमानुष कृत्याचा निषेध केला आहे. हे देखील वाचा: Hoshiarpur Shocker: शाळेच्या मुख्याध्यापकाची लहान मुलाला बेदम मारहाण; विचलित करणारी दृश्य आली समोर (Video)
आईने नवजात मुलीला फेकले कालव्यात
Nuh, Haryana: The lifeless body of the female infant was found in the canal near Lahawas village in Mewat
A villager says, ""We found this body in the canal, and it was lying there, poor thing. It was a dead baby... We then took it out from there and informed the police..." pic.twitter.com/BJuTxBjTPf
— IANS (@ians_india) January 5, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)