एका महिलेच्या हत्येप्रकरणी गोंडा पोलिसांनी 50 वर्षीय स्वयंघोषित मांत्रिकाला अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी याबाबत माहिती. खोडरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 ऑक्टोबर रोजी 35 वर्षीय मीना देवी यांचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता. ही महिला सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील रहिवासी असून तिच्या मुलींसोबत राहत होती, तर तिचा नवरा शहराबाहेर कामाला होता.

एसएचओ अरविंद कुमार यांनी माहिती दिली की, 'मीना अनेक महिन्यांपासून आजारी होती आणि तिला उपचारातून आराम मिळाला नाही, म्हणून एका गावकऱ्याच्या सल्ल्याने ती आरोपी मांत्रिक भगवानदिनला भेटायला गेली. कालांतराने या मांत्रिकाने मीना आणि तिच्या मुलींशी मैत्री केली. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी, त्याने मीनाला आपल्या घरी आणले आणि विशेष संस्कार करण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याला मीनाने नकार दिला. त्यानंतर रागाच्या भरात भगवानदिनने मीनाची हत्या करून तिचा मृतदेह झाडीत टाकण्यापूर्वी जाळला. बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली. (हेही वाचा: UP Shocker: उत्तर प्रदेश मध्ये कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने येऊन दोन तरूणांनी लुटलं ज्योतिषाचं सारं घर!)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)