UP Shocker: उत्तर प्रदेश मध्ये कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने येऊन दोन तरूणांनी लुटलं ज्योतिषाचं सारं घर!

सध्या या चोरीचा तपास सुरू आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे पोलिसांनी सांगितले आहे.

UP Shocker: उत्तर प्रदेश मध्ये कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने येऊन दोन तरूणांनी लुटलं ज्योतिषाचं सारं घर!
Robbery | (Photo Credit: Archived, edited, representative images)

यूपी मध्ये कुंडली पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन तरूणांनी घरच लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कानपूर मधील आहे. या तरूणांनी ज्योतिषाला कोल्ड ड्रिंक मध्ये नशेचं औषध मिसळून दिलं. ते प्यायल्यानंतर ज्योतिषी बेशुद्ध झाला. यानंतर त्यांनी घरातील सारं सामान साफ केलं. घरातील सीसीटीव्ही देखील ते लुटून घेऊन गेले. काही वेळाने शुद्धीत आल्यानंतर त्याने पोलिसांना सारा प्रकार सांगितला.

कानपूरच्या गोविंद नगर मध्ये राहणार्‍या तरूण शर्माने पोलिसांना सांगितले की चार दिवसांपूर्वी कृष्णा ठाकुर आणि कार्तिक परिहार हे दोन तरूण त्यांच्याकडे आले होते. त्यांनी आपली कुंडली दाखवली. यावेळी त्यांनी आपली गर्लफ्रेंड नाराज आहे तिला मनवण्यासाठी काय करावं? असा सवाल विचारला. तेव्हा ज्योतिषाने त्यांना 2 ऑक्टोबरला बोलावले.

सोमवारी ज्योतिषी घरात एकटे असताना पुन्हा हे तरूण आले. त्यांनी ज्योतिषाला बोलण्यात गुंगवून ठेवलं. जेवणानंतर त्यांनी कोल्ड ड्रिंकची बॉटल काढली आणि ते पेय प्यायल्यानंतर आपण बेशुद्ध झाल्याचे ज्योतिषी सांगतात. यामध्ये पैसे, सोनं, मोबाईल फोन ते सीसीटीव्ही सारं त्यांनी लंपास केल्याचं सांगितलं जात आहे. Baramati Robbery: अंधश्रद्धाळू चोरट्यांनी 'शुभ मुहूर्त' पाहून टाकला दरोडा; तब्बल 1 कोटींचा ऐवज लंपास, ज्योतिषासह सहा जणांना अटक 

सध्या या चोरीचा तपास सुरू आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे पोलिसांनी सांगितले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2023 11:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).