एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने शारीरिक संबंध आणि त्याबाबतच्या सहमतीबद्दल एक महत्वाची टिपण्णी केली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, सेक्स करण्याची परवानगी अथवा सहमती देणे याचा अर्थ असा नाही की, ते खाजगी क्षण चित्रित करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचीही परवानगी दिली गेली आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी बलात्काराच्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळताना सांगितले की, जर कोणी शारीरिक संबंधांसाठी सहमती देत असेल तर याचा अर्थ असा नाही की, त्या व्यक्तीने फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यास परवानगी दिली आहे. शारीरिक संबंधाची संमती ही, एखाद्या व्यक्तीच्या खाजगी क्षणांचे चित्रीकरण त्याचा  गैरवापर करण्यापर्यंत विस्तारित नाही.

कोर्टाच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी खासगी व्हिडिओचा फायदा घेतला गेला. अशा स्थितीत आरोपींमार्फत खाजगी व्हिडिओ बनवणे आणि नंतर त्याद्वारे महिलेला त्रास देणे ही लैंगिक शोषणाची रणनीती दिसून येते. गेल्या वर्षी विवाहित महिलेने नोंदवलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात एका पुरुषाला जामीन देण्यास नकार देताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. (हेही वाचा: Wife Drinking Alcohol and Divorce Case: 'पत्नीचे केवळ दारू पिणे ही पतीवर क्रूरता नाही...'; घटस्फोटप्रकरणी Allahabad High Court ची मोठी टिप्पणी)

Consent For Sex

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)