Same-Sex Relations: आजच्या काळात समलैंगिक संबंध ही नवीन गोष्ट नाही. समलैंगिक संबंधांची प्रकरणे सर्वत्र पहायला आणि ऐकायला मिळत आहेत. अनेक लोक अशा संबंधांच्या विरोधात असले तरी, सनातन धर्मातील काही धर्मगुरू अशा संबंधांचे समर्थन करताना दिसत आहेत. आता वृंदावनचे प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांनी समलैंगिक संबंधांवर अतिशय संवेदनशील आणि सकारात्मक संदेश दिला आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते समलिंगी आकर्षण वाटणाऱ्या लोकांबद्दल भाष्य करत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी पालकांनाही अशा विषयांवर शहाणपणाने आणि सहानुभूतीने निर्णय घेण्याचा संदेश दिला आहे.
एका तरुणाने महाराजांना एक अतिशय संवेदनशील प्रश्न विचारला- तो मुलींपेक्षा मुलांकडे आकर्षित होतो, परंतु त्याच्या पालकांची इच्छा आहे की त्याने मुलीशी लग्न करावे. यावर प्रेमानंदजी महाराजांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रेमानंद जी महाराज त्या तरुणाला म्हणाले, तुम्ही तुमच्या आई-वडिलांना तुमच्या परिस्थितीबद्दल संपूर्ण सत्य सांगा. तुम्ही मुलीशी लग्न करून तिच्या आयुष्याशी खेळू नका. देवाने तुम्हाला दिलेल्या या भावना या नैसर्गिक आहेत आणि त्या लपवणे किंवा त्याबाबत खोटे बोलणे योग्य नाही. ते पुढे म्हणाले, तुम्ही जर मुलांकडे आकर्षित होत असाल तर तुम्ही तुमच्या पालकांशी त्याबद्दल बोला, त्यांना समजावून सांगा. मुलीच्या आयुष्याशी खेळून लग्नासारखे पवित्र नाते बिघडवू नका. प्रेमानंद जी महाराज म्हणाले की, पालकांनीही आपल्या मुलांच्या भावना आणि इच्छा समजून घेतल्या पाहिजेत. पालक जेव्हा आपल्या मुलांवर बळजबरी करतात, तेव्हा ते चुकीचे आहे. मुलांचे विचार समजून घेण्याची गरज आहे. (हेही वाचा: Same-Sex Marriage: समलिंगी विवाह बंदी असंवैधानिक, जपानमधील फुकुओका उच्च न्यायालयाचा निर्णय)
Premanand Maharaj on Same-Sex Relations-
This is not going down well with the fundamentalists - but this is what the essence of Hinduism transmits. A religion that is not bound by narrowness; infact accommodative to change, progressive in thought and empathetic to those in need.
Premanand Ji Maharaj delivers a… pic.twitter.com/ZaLzp5epOB
— The DeshBhakt 🇮🇳 (@TheDeshBhakt) January 19, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)